पालघर मध्ये दुहेरी हत्याकांड! बायकोला प्रियकरासोबत बघितले अवघडलेल्या अवस्थेत, दोघांचीही कु-हाडीने केली हत्या

पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पालघर (Palghar) मध्ये सफाळे परिसरात दुहेरी हत्याकांडाची (Double Murder) धक्कादायक घटना समोर आली आहे. सफाळ्यात (Safale) अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत नव-याने आपल्या बायकोला तिच्या प्रियकरासोबत अवघडलेल्या अवस्थेत पाहिले आणि तोच राग मनात ठेवून आरोपीने आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराची कु-हाडीने वार करुन हत्या केली. या प्रकरणी दिलीप तानाजी ठाकरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संगिता दिलीप ठाकरे आणि पांडू बाळकृष्ण श्रावण अशी मृतांची नावे आहे. पांडू बाळकृष्ण श्रावणे हा दहिसरमधील मनोर गावातील रहिवाशी आहे. त्याचे संगिता दिलीप ठाकरे या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. आरोपी दिलीप आणि मृत पांडू हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दिलीप घरी नसताना पांडू संगिताला भेटण्यासाठी घरी येत असतं. कालही (6 फेब्रुवारी) पांडू दिलीप नसताना त्याच्या घरी आला होता. मात्र काही वेळानंतर आरोपी दिलीप तेथे आला. त्याने या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि त्याच्या स्वत:वरचा ताबा सुटला. रागाच्या भरात त्याने घरात असलेल्या कु-हाडीच्या दांड्याने संगिता आणि पांडूच्या डोक्यात कु-हाडीने वार केले. यात दोघांचाही जागीच जीव गेला.हेदेखील वाचा- Solapur: अंगावरील स्वेटरची दोरी खुंटीत अडकल्याने फास लागून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

या प्रकरणी सफाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलीप ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान प्रियकराच्या मदतीने एका महिलेने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कर्जत (Karat) तालुक्यातील मिरजगाव येथे तब्बल 11 महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृताची पत्नी आणि बावडकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढायचा असे दोघांही ठरवले. योजनेनुसार, पतीला भरपूर दारु पाजली आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात चुलीच्या फुंकणीने प्रहार केला. बेशुद्ध पडलेल्या प्रमोदला दोघांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र मार्च 2020 मध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे पत्नीने पोलिस जबाबात सांगितले.