Chandrapur Crime: अनैतिक संबंध आणि सरकारी नोकरीच्या लोभापोटी पतीची हत्या, पत्नीसह चौघांना अटक
ही हत्या असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. ज्यामुळे या हत्येमागचे गूढ उकलले.
चंद्रपूरातील (Chandrapur) वर्धा नदी किनारी (Wardha River) एका व्यक्ताचा मतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. ही हत्या असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. ज्यामुळे या हत्येमागचे गूढ उकलले. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) आणि सरकारी नोकरी (Government Job) मिळण्याच्या लोभापोटी पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मारूती काकडे (वय, 34) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारूती हा सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होता. त्याला दारूचे व्यसन होते. यामुळे त्याचे पत्नी प्राजक्तासोबत वारंवार भांडण होत असत. प्राजक्ताचे तिच्या बहिणीचा दीर संजय टिकलेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूनंतर त्याची सरकारी नोकरी आपल्याला मिळण्याच्या लोभापोटी प्राजक्ताने संजयसोबत मारूतीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार, मारूतीचा गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी फेकले. हे देखील वाचा- Thane: हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग; 4 जण अटकेत
मारुतीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल कॉल्स डिटेल्सची पडताळणी केली. त्यावेळी वेगळाच संशय आल्याने पोलिसांनी प्राजक्ताला चौकशीसाठी बोलावले. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवताच प्राजक्ताने हत्येची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नी प्राजक्ता, तिची आई कांता म्हशाक्षेत्रे, प्रियकर संजय टिकले आणि कटात सहभागी असलेल्या विकास नागरलेला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने माहिती दिली आहे.