गोदिंया: चारित्र्यावर संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या
सुमन मनोज सावनकर (वय, 28 वर्षे)असे पीडीत महिलेचं नाव आहे. तसेच मनोज सावनकर असे आरोपी पतीचे नाव आहे. सुमन आणि तिचा पती मनोज यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडण होत होते. या वादातूनचं सुमनची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गोंदिया शहरातील कुडवा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुडवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोदिंया (Gondia) जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमन मनोज सावनकर (वय, 28 वर्षे)असे पीडीत महिलेचं नाव आहे. तसेच मनोज सावनकर असे आरोपी पतीचे नाव आहे. सुमन आणि तिचा पती मनोज यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडण होत होते. या वादातूनचं सुमनची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गोंदिया शहरातील कुडवा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुडवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज हा सुमनला वारंवार मारहाण करत होता. सुमनची हत्या करण्यात आली, त्यादिवशी त्याचे आणि सुमनचे भांडण झाले होते. सुमनला मारहाण करताना त्यांची 5 मुलगीही घटनास्थळी होती. मनोजने सुमनला मारहाण करत तिचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर गळा दाबून तिला संपवलं. विशेष म्हणजे या घटनेची माहिती कोणाला होऊ नये, यासाठी मनोजने सुमनला रुग्णालयातही नेलं. परंतु, डॉक्टरांनी सुमनला मृत घोषीत केले. त्यानंतर मनोजने सुमनचा मृतदेह घरात आणला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. (हेही वाचा - यवतमाळ: पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या)
दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनोजला अटक केली आहे. मनोज तिला कायम त्रास देत होता, असा आरोप सुमनच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. डिसेंबर महिन्यात नवी मुंबई येथे अशाचं स्वरुपाची घटना घडली होती. पतीने चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा मारून तिची हत्या केली होती. नानासाहेब लांडगे, असं या आरोपी पतीचं नाव होतं. आरोपीला आपली पत्नी कल्पना हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होतं. त्यामुळे आरोपीने पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.