Human Sacrifice: कोल्हापुरात नरबळी? हळद कुंकू लावलेल्या अवस्थेत 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह
कोल्हापूर ( Kolhapur) येथे सात वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह हळद (Turmeric), कुंकू (Kumkum) लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरव केशव केशरे (Arav Keshav Kesare) असं या मुलाचे नाव आहे. कापशी येथे एका घराच्या पाठीमागे त्याचा मृतदेह आढळून आला.
कोल्हापूर ( Kolhapur) येथे सात वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह हळद (Turmeric), कुंकू (Kumkum) लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरव केशव केशरे (Arav Keshav Kesare) असं या मुलाचे नाव आहे. कापशी येथे एका घराच्या पाठीमागे त्याचा मृतदेह आढळून आला. आरव याच्या मृतदेहाच्या अंगावर हळद-कुंकू आढळून आल्यामुळे हा नरबळी (Human Sacrifice) असल्याचा प्रकार असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे अपहरण झाले होते.
घटनेबाबत माहिती अशी की, घराबाहेर खेळत असलेला आरव दोन आठवड्यांपासून दिवसांपासून गायब होता. आरवचे कुटुंबीय आणि गावकरी यांच्याकडून त्याचा शोध सुरु होता. त्याचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त होत होती. अखेर मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गावापासून दूर अंतरावर असणाऱ्या एका जुन्या घरामागे आरव याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह सापडला त्या वेळी त्याच्या अंगावर हळ आणि कुंकु आढळून आले. त्यामुळे नरबळीतूनच त्याची हत्या झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, धक्कादायक! कोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून पुजाऱ्याने देवीला दिला नरबळी; गावातीलच व्यक्तीचे डोके धडापासून केले वेगळे)
घडलेल्या प्रकारामुळे गावकरी हादरुन गेले आहेत. लहान मुलांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, ही हत्या आहे, नरबळीचा प्रकार आहे की आणखी काही काळेबेरे यामागे आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपासही सुरु केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करुन आरोपींचा छडा लावावा. दोषींना कोर्टाच्या दारात उभा करुन अरवला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2021 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

