Mumbai Local Mega Block 7 Nov: रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर

मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 7 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागातील हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

मुंबई लोकल ट्रेन(Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेकडून रविवारी तांत्रिक कारणांमुळं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 7 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागातील हार्बर आणि ट्रान्स मार्गावर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वे दि. 7 नोव्हेंबर रोजी देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेणार आहे. (हे ही वाचा Mumbai Local Ticket Rules: फक्त 'याच' लोकांना मिळणार मुंबई लोकलचे तिकीट, मध्य रेल्वेने केले स्पष्ट.)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4..40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत आणि ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणा-या आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी 10.15 ते सायंकाळी 04.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.