Maharashtra Board HSC, SSC Result 2024: MSBSHSE कडून इयत्ता 10, 12 बोर्ट परिक्षाचे निकाल hscresult.mkcl.org वर अल्पावधीतच होणार जाहीर, विद्यार्थ्यांना उत्सुकता; अध्याप अधिकृत सूचना नाहीच
MSBSHSE द्वारे या निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2024 च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालांच्या घोषणेची विद्यार्थी वाट पाहत आहेत. MSBSHSE द्वारे या निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा इयत्ता 10 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC) किंवा इयत्ता 12वीचे निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, अधिकृतरित्या या चर्चेला दुजोरा मिळू शकला नाही.
तारखेबाबत अनिश्चितता
दरम्यान, MSBSHSE द्वारे निकाल झाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचे निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. त्यांचे निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांनी त्यांच्या आईच्या नावासह त्यांचा रोल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. इयत्ता 10 ची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती, तर इयत्ता 12 ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती, या वर्षी अंदाजे 26 लाख उमेदवारांनी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBHSE) आतुरतेने वाट पाहत असलेल्या इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. तसेच निकालाच्या तारखेबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाही. मात्र, घोषणेनंतर, विद्यार्थी mahresult.nic.in, msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org वर त्यांचे निकाल त्वरित पाहू शकतात. (हेही वाचा, Maharashtra Board HSC Result 2024: MSBSHSE कडून लवकरच जाहीर होणार 12वीचा निकाल mahresult.nic.in वर; विद्यार्थ्यांना बोर्डाकडून तारखेच्या घोषणेचे वेध!)
खालील अधिकृत लिंक्सद्वारे विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात:
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in
- msbshse.co.in
महाराष्ट्र एसएससी, एचएससी बोर्ड निकाल आणि ऑनलाइन गुण तपासण्याची प्रक्रिया
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
मागील वर्षीच्या 12वीच्या परीक्षेत, जवळपास 91.25% विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली होती, ज्यामध्ये 14,16,371 विद्यार्थी बसले होते आणि अंदाजे 12,92,468 उत्तीर्ण झाले होते. मागील वर्षी इयत्ता 12वीच्या परीक्षेत, कोकण विभाग 96.01% उत्तीर्णतेसह अव्वल कामगिरी करणारा जिल्हा म्हणून ओळखला गेला तर मुंबई सर्वात खराब कामगिरी करणारा जिल्हा म्हणून नोंदवला गेला.