Amravati Accident: अमरावतीच्या दर्यापूरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा नदीपात्रात कोसळली; 2 मुली बेपत्ता, एकाचा मृत्यू
15 प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा नदीपात्रात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
Amravati Accident: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात (Amravati Accident) झाल्याची घटना घडली. 15 प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा नदीपात्रात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय 2 लहान मुलीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समजते आहे. त्यांचा शोध सुरू आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामगाव मार्गे कोळंबीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या नदीपत्रावर संरक्षण भिंत नसल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा आरोप जखमींसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा: Chembur Road Accident: चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात भरधाव कारचा अपघात; दुभाजकावर आदळून टँकरला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दर्यापूर येथे आठवडी बाजार होता. या बाजाराला विविध ठिकाणाहून नागरिक आले होते. बाजार करून घरी परतत असताना रिक्षाचालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि रिक्षा चंद्रभागानदी पात्रात कोसळली. यात 15 पैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. (हेही वाचा: Kolhapur Accident: रस्त्यावरून जात असताना भरधाव कारने तरुणाला उडवले, चालक फरार , गुन्हा दाखल)
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खांबा-वडेगाव मार्गावर पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भजन मंडळींना घेऊन निघालेला टेम्पो पुलावरून थेट नाल्यात कोसळला. या अपघातात टेम्पोमधील दोन वर्षीय आणि पाच वर्षीय अशा दोन मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात. तर 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.