Nagpur Accident: दुचाकीचा भीषण अपघात, ट्रकने चिरडल्यामुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

नागपूरमध्ये ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये वाढत्या अपघातीच्या घटना पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहे.

Nagpur Accident: दुचाकीचा भीषण अपघात, ट्रकने चिरडल्यामुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Accident PC PIXABAY

Nagpur Accident: नागपूरमध्ये ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये वाढत्या अपघातीच्या घटना पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहे. दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. अनियंत्रित कारने  9 लोकांना चिरडले आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे.  हेही वाचा-लांडगा पिसाळला, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 6 जणांना चावा 29 जनावरांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नागपूर शहरातील काठोल परिसरातील गोरेवाडा झू येथे घडला. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. या अपघातात १७ वर्षाच्या मुलाने आपले प्राण गमावले आहे. अश्विन आठवले असं अपघातात मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. अश्विन दुचाकीवरून जात होता त्यावेळी ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विन ट्रक खाली चिरडला गेला. रस्त्यावरचा अपघात पाहून लोकांनी गर्दी केली. गर्दी पाहताच ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला.

अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच, मुलाला ताब्यात घेतले त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु त्याचे प्राण वाचू शकले नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आवड्याभरात हिड अॅड रनची ही तिसरी घटना घडली आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).