जळगाव: आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडून 17 वर्षीय मुलीची हत्या
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) तालुक्यामधील तळवेल गावात ऑनर किंलिंगची (Honor Killing) धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांनीचं आपल्या 17 वर्षीय मुलीला संपवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) तालुक्यामधील तळवेल गावात ऑनर किंलिंगची (Honor Killing) धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांनीचं आपल्या 17 वर्षीय मुलीला संपवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताचं तळवेल गावात एकच खळबळ उडाली. सुधाकर मधुकर पाटील आणि नंदाबाई सुधाकर पाटील, असं या आरोपी आई-वडीलांची नावे आहेत. या दोघांना आपल्या 17 वर्षीय मुलीचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. या रागातून सुधाकर आणि नंदाबाई यांनी मुलीची झोपेतचं गळा आवळून हत्या केली. (हेही वाचा - Honour Killing: गोत्राबाहेर लग्न केल्याने आई वडिलांनीच गळा दाबून केली मुलीची हत्या; कुटुंबातील इतर सदस्यांनी दिली साथ)
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली. त्यामुळे भुसावळ पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडीलांना अटक केली आहे. तसेच या निर्दयी आई-वडीलांनी मुलीच्या खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, आज सकाळी दिल्लीमध्येदेखील ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली. एका 25 वर्षाच्या युवतीने आपल्या गोत्राबाहेरील व्यक्तीशी लग्न केल्याने संतप्त पालकांनी मुलीचा गळा आवळून हत्या केली. तसेच हत्येनंतर वडिलांनी मुलीचा मृतदेह घरापासून 80 किमी अंतरावर फेकून दिला. या घटनेमुळे पूर्व दिल्ली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2020 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

