Jalna Honour Killing: जालन्यात हॉनर किलिंगची घटना; वडिलांनी आणि काकांनी झाडाला लटकवून केली मुलीची हत्या
कुटुंबातील कोणीही या भयानक कृत्याला विरोध केला नाही. गावातील कोणीतरी पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Jalna Honour Killing: जालना (Jalna) येथे मंगळवारी एका मुलीची तिच्या वडील व काकांनी झाडाला लटकून हत्या (Murder) केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगावची आहे. पीडित मुलगी या आठवड्याच्या सुरुवातीला तिचा दूरचा नातेवाईक आणि तिचा प्रियकर असलेल्या मुलासह घरातून निघून गेली होती. लग्न करून देतो असे सांगून तिच्या वडिलांनी तिला परत बोलावले.
तीन दिवसांनंतर, मुलगी घरी परतली. तिच्या लग्नाची सर्व तयारी आजूबाजूच्या मर्यादित नातेवाईकांसह केली गेली होती. मात्र, लग्नापूर्वी तिचे वडील संतोष सरोदे आणि काका नामदेव सरोदे यांनी तिला मंडपातून घराजवळील झाडावर ओढून नेले. त्यानंतर त्यांनी तिच्या गळ्याला दोरी बांधून तिला झाडाला लटकवले. (हेही वाचा - Kolhapur Black Magic: मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू; वशीकरण, करणीच्या नावाखाली कोल्हापूरमध्ये अघोरी प्रकार)
या सर्व प्रकारानंतर त्यांनी तिला खाली उतरवून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह चितेवर जाळला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी तिची राख एका पिशवीत टाकली. समाजात बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी तिची हत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे दाखवण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला. (हेही वाचा - Mumbai Police: भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या मुलाची सुटका, मुंबईतील कांजूरमार्ग पोलिसांच्या तपासाला 11 दिवसांनी यश)
मात्र, कुटुंबातील कोणीही या भयानक कृत्याला विरोध केला नाही. गावातील कोणीतरी पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2022 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

