शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून 1 लाख रुपयांची मदत; रस्त्यावर पोटासाठी करायच्या कसरत

त्यामुळे अनेकांनी शांताबाईंना आर्थिक मदत दिली आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी शांताबाई पवार यांची भेट घेत त्यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

Anil Deshmukh, Shantabai Pawar (PC - Twitter)

पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या शांताबाई पवार (Shantabai Pawar) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी शांताबाईंना आर्थिक मदत दिली आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी शांताबाई पवार यांची भेट घेत त्यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशीचं परिस्थिती शांताबाईं पवार यांच्यावर ओढावली आहे. शांताबाई पोटापाण्यासाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या काही मुलांसाठी पुण्यात बाहेर पडून मार्शल आर्ट्सचे खेळ करतात. त्यातून त्या आपला खर्च भागवतात. (हेही वाचा - Shantabai Pawar Viral Video: पुणे मध्ये अर्थाजनासाठी लाठी-काठींची कसरत करणार्‍या शांताबाई पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडीयात व्हायरल; अभिनेता रितेश देशमुख सह मदतीसाठी पुढे आले अनेक हात!)

दरम्यान, 85 वर्षीय शांताबाई यांचा व्हिडिओ पाहून त्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या व्हिडिओची दखल अभिनेता रितेश देशमुख आणि पुण्याच्या आयुक्तांनीदेखील घेतली. रितेश देशमुखने या आजीचा व्हिडिओ शेअर करत त्यांचा पत्ता मागवला होता. त्याने सढळ हाताने या आजीला आर्थिक मदत देऊ केली आहे.