Colleges Reopen in Maharashtra: राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याबाबत उदय सामंत यांचे महत्त्वपूर्ण विधान
ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी शाळा-कॉलेजेस पुन्हा कधी सुरु होणार, या प्रतिक्षेत विद्यार्थ्यी आणि पालक होते. मात्र विद्यार्थी-पालकांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार असल्याचं दिसत आहे.
कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) दीड वर्षांपासून राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी शाळा-कॉलेजेस पुन्हा कधी सुरु होणार, या प्रतिक्षेत विद्यार्थी पालक होते. मात्र विद्यार्थी-पालकांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार असल्याचं दिसत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Higher And Technical Education Minister Uday Samant) यांनी महाविद्यालयं सुरु करण्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सीईटी परीक्षा (CET Exam) झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
उदय सामंत यांनी यावेळी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबर पासून राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यानी म्हटलं आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाचे संकट पाहता नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Maharashtra Unlock: राज्यातील शाळा-महाविद्यालयं, मंदिरं कधी खुली होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती)
दरम्यान, यावेळी सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार आहेत. सीईटी परीक्षेसाठी मागील वर्षी 197 केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ करण्यात आली असून यंदा 226 केंद्रावर परीक्षा होणार आहेत. ही परीक्षा ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.
राज्यातील कोविड-19 चे संकट कायम आहे. दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा रुग्णवाढ दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेचा धोकाही कायम आहे. त्यामुळे लसीकरण वाढवणे आणि कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.