High Tide in Mumbai: निसर्ग चक्रीवादळ काळात मुंबईत समुद्राला भरती, जाणून घ्या वेळ आणि लाटांची उंची

मुंबईत सकाळी 10:14 वाजता 4.26 मीटर उंच आणि रात्री 9:58 वाजता 4.08 मीटर उंच भरती येईल. मंगळवारी रात्री, शहरात रात्री 9:06 वाजता जास्तीत जास्त 4.01 मीटर उंच भरतीचा अनुभव येईल.

मरीन ड्राईव्ह, मुंबई (Photo Credits: ANI)

चक्रीवादळ “निसर्ग” (Nisarga) 3 जून रोजी महाराष्ट्राच्या अलिबाग जवळील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे, मुंबई (Mumbai), ठाणे, रायगड आणि पालघरसह राज्यातील किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात (Arabian Sea) भरती होईल. मुंबईत सकाळी 10:14 वाजता 4.26 मीटर उंच आणि रात्री 9:58 वाजता 4.08 मीटर उंच भरती येईल. मंगळवारी 'निसर्ग' भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ येत असल्याने मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी रात्री, शहरात रात्री 9:06 वाजता जास्तीत जास्त 4.01 मीटर उंच भरतीचा अनुभव येईल. समुद्राला 4 जून रोजी सकाळी  11:04 वाजता 4.58 आणि 4.12 मीटरची भरती येणार आहे. 5 जून रोजी सकाळी 11:50 वाजता 4.77 मीटर उंच आणि रात्री 11:50 वाजता 4.11 मीटर उंचीच्या भरती समुद्राला येणार आहे. (Cyclone Nisarga Updates: निसर्ग चक्रीवादळ- मुंबई, महाराष्ट्रात काय तयारी? NDRF, रेल्वे आणि विमानसेवा यांची स्थिती काय?)

6 जून रोजी दुपारी 12.33 वाजता मुंबईत 4.86 मीटर उंच भरती दिसू शकेल. रविवारी पहाटे 12.16 वाजता 4.04 मीटर उंच आणि दुपारी 1:16 वाजता 4.83 उंचीची भरती समुद्राला येणार आहे. दरम्यान, आदल्या दिवशी अरबी समुद्रामध्ये वादळ वाढल्याने उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निसर्गामध्ये वाढ झाली. 11 नोव्हेंबर, 2009 रोजी मुंबईत ‘फ्यान’, हे अखेरचे चक्रीवादळ आले आले होते. निसर्ग सध्या मुंबईपासून सुमारे 400 किमी अंतरावर आहे. जून महिन्यात प्रथमच चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्यावर धडकणार आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळ आणि तीव्र चक्रीवादळांची संख्या गेल्या पाच वर्षांत सुमारे 32 टक्क्यांनी वाढली आहे.

भरती ओहोटी
वेळ 10:06 4.16 वेळ 03:32 15:55
मीटर मध्ये उंची. 4.26 0.922 मीटर मध्ये उंची. 0.69 1.61

मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. काही तासांत हे वादळ धडकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या 20 टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले आहे.