Cyclone Vayu Update: मुंबईवर घोंगावतय वायू वादळाचे सावट; बोरिवली, गोराई येथून नागरिकांचे स्थलांतर; मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश

तसेच, सुमुद्र पाहण्यासाठी अथवा पावसाची मजा घेण्यास जाऊ नये. दरम्यान, मुंबईतील समुद्रही खवळल्याचे चित्र आहे. समुद्रात पाण्याच्या उंचच उंच लाटा उसळत असून, त्या लाठा किनारपट्टीवरही धडकत आहेत. समुद्रात वारेही वेगाने वाहात आहे.

Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

मुंबई शहरावर वायू चक्रीवादळ (Cyclone Vayu) संकट म्हणून घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, मुंबई महापालिका (BMC), मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि राज्याचा अपत्ती निवारण विभाग सतर्क झाला आहे. मुंबई समुद्र किनारपट्टीवर NDRF, अग्निशमन आणि पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच, किनारपट्टी शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून बोरिवली, गोराई येथील नागरिकांना स्थलांतरीतही करण्यात आले आहे.

मुंबई आयुक्तालयाने अवाहन केले आहे की, समुद्र किनारपट्टीवर दुचाकी अथवा चारचाकी अशी कोणत्याच प्रकारची वाहने उभी करुन नयेत. तसेच, सुमुद्र पाहण्यासाठी अथवा पावसाची मजा घेण्यास जाऊ नये. दरम्यान, मुंबईतील समुद्रही खवळल्याचे चित्र आहे. समुद्रात पाण्याच्या उंचच उंच लाटा उसळत असून, त्या लाठा किनारपट्टीवरही धडकत आहेत. समुद्रात वारेही वेगाने वाहात आहे. त्यामुळे मुंबई आयुक्तालयाने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, Cyclone Vayu चा परिणाम मुंबईकरांना जाणवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, वायू चक्रीवादळ हे गुजरात राज्य समुद्र किनारपट्टीवरुन पुढे सरकले आहे. या वादळाचा मोठा परिणाम मुंबई शहरावर होऊ शकतो. या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. हाती आलेल्या माहितीनुसार हे वादळ मुंबईतील दक्षिण किनारपट्टीपासून 280 किमी अंतरावर पोहोचले आहे. या वादळाच्या वाऱ्याचा वेग 110-115 किलोमिटर प्रतिसात इतका आहे.