'या' कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाही पाहिला 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर'
ते स्वतः हा चित्रपट पाहण्यास जाणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होत्या. काल मुख्यमंत्री जाणार असं बोललं जात होतं परंतु, त्यांना काही कारणांमुळे ते शक्य झालेलं नाही.
Uddhav Thackeray On Not Watching Tanhaji Movie: 2020 च्या सुरुवातीलाच तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने घसघशीत कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली. इतकंच काय तर खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील या चित्रपटाची भुरळ पडली आहे. ते स्वतः हा चित्रपट पाहण्यास जाणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होत्या. काल मुख्यमंत्री जाणार असं बोललं जात होतं परंतु, त्यांना काही कारणांमुळे ते शक्य झालेलं नाही. तरीही ते पुढील काही दिवसात हा सिनेमा पाहणार हे मात्र नक्की.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी काल मुंबईतील प्लाझा सिनेमा येथे चित्रपटाचं एक खास स्क्रीनिंग करण्यात येणार होतं. आणि मुख्यमंत्री तिथे पोहोचले देखील. परंतु, त्यांनी तिथे जाऊन फक्त 'वाईल्ड मुंबई' या चित्रफीतीचा शुभारंभ केला असून ते तान्हाजी पाहण्यासाठी मात्र उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी चित्रपट का पाहिला नसावा, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की ते त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबतच हा चित्रपट पाहणार आहेत. त्यामुळे पुढील काहीच दिवसात ते नक्की हा सिनेमा पाहतील यात काही शंका नाही.
तान्हाजी: स्वत:च्या चित्रपटावर टीका केल्यानंतर सैफ अली खान ठरला सोशल मीडियावरील ट्रोल चा शिकार
दरम्यान, तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू चालली असली तरी त्यातील एका अभिनेत्यामुळे हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सैफ अली खानने नुकतंच एका मुलाखतीत त्याने चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर टीका केली होती. त्याच्या या टीकेनंतर, नेटकऱ्यांनी मात्र सैफला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.