महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी Sonia Gandhi यांना घातली 'ही' भीती; म्हणूनच शिवसेनेसोबत बोलणी करायला त्यांनी दाखवली तयारी

त्यांनी सांगितल्यानुसार, "सत्तेत गेलो नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल," अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती.

Congress President Sonia Gandhi and MP Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करायला गेली असताना, त्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची अधिकृत पाठिंब्याची पत्रकं नसल्यामुळे शिवसेना सत्ता स्थापन करू शकलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माध्यमांना सांगितल्यानुसार ते सत्तेत जायला तयार होते. परंतु काँग्रेसचा निर्णय झाला नसल्याने त्यांनी ही पत्रक दिलं नव्हतं. पण काँग्रेसच्या निर्णयाला नेमका वेळ लागला होता तो म्हणजे हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडूनच पक्षाला कोणताही निर्णय आला नाही.

शेवटी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडला एक भीती घातली असल्याचं वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तावाहिनीने दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, "सत्तेत गेलो नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल," अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती. आणि या भीतीपोटीच सोनियांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्रित पाठिंबा देऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत सामील व्हायचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने तसं बघायला गेलं तर त्यांचा विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हात मिळवणी करण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकारिणीतील नेते एके अँटनी, मुकुल वासनिक, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे कुटुंबाचा हिंदुत्वावादाचा मुद्दा काँग्रेसच्या विचारधारेशी मिळताजुळता नसल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना घातली 'ही' भीती; म्हणूनच शिवसेनेसोबत बोलणी करायला त्यांनी दाखवली तयारी 

तसेच सध्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, काँग्रेस सत्तेत स्थापन झाल्यास ते उपमुख्यमंत्री पदाची मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे करणार आहेत.