महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री होणार की नाही, यावर उद्धव ठाकरे म्हणाले...
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारताच, ते म्हणाले, "बाप म्हणून मला नक्कीच वाटतं की आदित्यने मुख्यमंत्री व्हावं."
शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) या पक्षांनी आज पत्रकार परिषद घेतली. परिषदेदरम्यान दोन्ही पक्षांनी आपल्या महायुतीची औपचारिक घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांसंदर्भातील अनेक महतवाच्या बाबींवर भाष्य केले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारताच, ते म्हणाले, "बाप म्हणून मला नक्कीच वाटतं की आदित्यने मुख्यमंत्री व्हावं."
नक्की वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: बंडखोरांना भाजप-शिवसेना महायुतीत जागा नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पण इतक्यावरच न थांबता ते पुढेही म्हणाले, "आदित्यने आताच सक्रिय राजकारणात एन्ट्री घेतली आहे. आम्ही यात खूप आधीपासून आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी हे खूप नवीन आहे. आता त्यानेच ठरवावं की त्याला काय करायचंय. मी त्यात काही म्हणणार नाही."
आदित्य ठाकरे यांनी काल (3 ऑक्टोबर) मुंबईतील वरळी येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर त्यांच्या विरुद्ध बिग बॉस मराठी 2 स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.