संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर अखेर शरद पवार बोलले

पत्रकारांशी संवाद साधताना या संबंधित माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले, “संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मला दूर ठेवा. मला त्या वादात पडायचं नाही. परंतु, इंदिरा गांधींबद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं.”

Sanjay Raut, Sharad Pawar (Photo Credits: Facebook)

Sharad Pawar On Sanjay Raut's Statement: अलीकडेच संजय राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी निषेध व्यक्त केला. आणि अखेरी संजय राऊत यांना त्यांचं हे वक्तव्य मागे घ्यावं लागलं. तसेच राऊत यांनी त्यासंबंधित स्पष्टीकरण देताना त्याचा अर्थ काही वेगळा होता असे सांगितले. आता मात्र त्यांच्या त्या वक्तव्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना या संबंधित माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले, “संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मला दूर ठेवा.  मला त्या वादात पडायचं नाही. परंतु, इंदिरा गांधींबद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं.”

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील संबंध तसे खूप जवळचे आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी देखील संजय राऊत नेहमी शरद पवार यांच्या निवासस्थानी जात होते. परंतु, आता राऊतांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील अंतर वाढणार का असा प्रश्न समोर येतो.

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची नेमकी भेट कशी झाली होती? वाचा त्या मागचं सत्य

दरम्यान, दैनिक लोकमत या वृत्तसंस्थेने अलीकडेच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिथे संजय राऊत हे पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्याची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत त्यांनी मुंबई किती बदलली आहे हे सांगत असताना, इंदिरा गांधी या करीम लाला याची भेट घेत असत असे म्हणाले होते.

त्यांनतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि संजय निरूमन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा कडकडून विरोध केला होता.