मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर अनिल कपूर यांनी ट्विट करून दिले मजेशीर उत्तर
भाजप आणि शिवसेनेचा जोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत अभिनेता अनिल कपूर याला मुख्यमंत्री पदी नियुक्ती करा, असं अनेक मिम्समधून नेटकऱ्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला आहे तरी राज्यात अजून सरकार स्थापनेविषयी कोणत्याच अधिकृत हालचाली घडताना दिसत नाहीत. भाजप आणि शिवसेना
या दोन्ही पक्षांमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहेत.
शिवसेनेला आपलं मुख्यमंत्री हवा आहे तर भाजप सुद्धा मुख्यमंत्री त्यांचाच होईल या मुद्द्यावर असून बसले आहे. या सर्व बाबी लक्षात घेत सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पकतेला उधाण आलं आहे.
भाजप आणि शिवसेनेचा जोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत अभिनेता अनिल कपूर याला मुख्यमंत्री पदी नियुक्ती करा, असं अनेक मिम्समधून नेटकऱ्यांनी म्हटलंय.
'नायक' चित्रपटात अनिल कपूरने केलेला मुख्यमंत्र्यांचा रोल भलताच गाजला होता आणि त्याची हटके शैली लोकांना प्रचंड भावली होती. म्हणून नेटकऱ्यांनी ही मजेशीर मागणी शिवसेना आणि भाजपकडे केली आहे.
यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नेटकऱ्यांच्या या मागणीवर खुद्द अनिल कपूर यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘मै नायक हीं ठीक हूँ’, असं लिहीत त्यांनी एका नेटकाऱ्याच्या ट्विटवर उत्तर दिलंय.
भाजप-शिवसेना तुटेपर्यंत ताणणार की 'ठरलंय तसंच करणार'? काय म्हणाले उद्धव ठाकरे?
नायक चित्रपटात एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरापर्सन ते एक दिवसाचा मुख्यमंत्री असा पल्ला अनिल यांनी त्यांच्या भूमिकेतून गाठला. या एका दिवसाच्या कालावधीत सुद्धा मुख्यमंत्री काय काय समाजात बदल घडवू शकतो आणि कसा भ्रष्टाचार रोखू शकतो हे सुंदररित्या दाखवलं आहे.