Coronavirus Lockdown काळात रेशनिंग संदर्भात माहिती मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला हेल्पलाईन नंबर, ईमेल, वेबसाईट; मुंबई, ठाणे शहरांसाठी विशेष नंबरची सोय

मात्र त्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहचत नसल्यास, त्या संदर्भात तुम्हाला काही समस्या असल्यास किंवा रेशनिंग संदर्भातील कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करु शकता.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

कोरोना व्हायरसचे संकट महाराष्ट्र राज्यात अधिक तीव्र होऊ लागले आहे. या जागतिक संकटाचे पडसाद समाजातील विविध स्तरावर उमटत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारी कामगार, मजूर, गोरगरीब यांचे प्रचंड प्रमाणावर हाल होत आहेत. दोन वेळेच्या अन्नाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांचे हाल होऊ नयेत, त्यांना दोन वेळेचे अन्न मिळावे म्हणून सरकारने विविध सुविधा सुरु केल्या आहेत. मात्र त्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहचत नसल्यास किंवा रेशनिंग संदर्भातील कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा तक्रार दाखल करायची असल्यास तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करु शकता. (केशरी शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार 'ही' सुविधा)

हेल्पलाईन नंबर वर कॉल करुन किंवा ईमेल आयडीवर मेल करुन तुम्ही रेशनिंग संदर्भात माहिती मिळवू शकता. तसंच वेबसाईवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. तसंच मुंबई, ठाणे शहरांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडीची सोय करण्यात आली आहे. (Lockdown: रेशनवरील धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल; अलिबाग येथील घटना)

महाराष्ट्र राज्यासाठी हेल्पलाईन क्रमांक:

# 1800 22 4950/ 1967 - टोल फ्री क्रमांक

# 022-23720582/ 23722970/ 23722483 - अन्य हेल्पलाईन

# ईमेल आयडीः helpline.mhpds@gov.in

मुंबई, ठाणे शहरांसाठी क्रमांक:

# 022-22852814- हेल्पलाईन क्रमांक

# ईमेल आयडीः dycor.ho.mum@gov.in

# ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी वेबसाईट: mahafood.gov.in

CMO Maharashtra Tweet:

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज त्यात 134 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1895 वर पोहचला आहे. सतत वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता लॉकडाऊन कायम न ठेवल्यास येत्या काळात धोका अधिक वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.