Konkan Rain Updates: कोकणात मुसळधार! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नारंगी नदीला पूर (Watch Video)

खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

Photo Credit -X

Konkan Rain Updates: कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. जगबुडी नदीसोबतच नारंगी नदीला देखील पूर आला आहे. पुराचं पाणी रस्त्यावर येत असल्याने खेड-दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन तासांपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. (हेही वाचा:Sinhagad Trek: आतकरवाडी मार्गावर दरड कोसळली, ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे वन विभागाकडून आवाहन )

व्हिडीओ पहा

पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे नगर परिषद कडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या महापुराचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. शनिवार आणि रविवारी पहाटेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खेड मटण मार्केटमधे पुराचं पाणी शिरलं आहे.