Maharashtra Rain Updates: मुंबईत मुसळधार पाऊस, महालक्ष्मी रेसकोर्स, जेएनपीटीसह अनेक ठिकाणी तुडुंब पाणी, रेल्वे ठप्प, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

मुंबई महापालिकेने तसा निर्णयही घेतला होता. दरम्यान, या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा जलाशय भरला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain

Maharashtra Rain Updates: मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे (Thane), रायगड (Raigad) आणि कोकणातही मुसळधार पावसाने (Heavy Rains in Mumbai) आज जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईची वाहिणी अशी ओळख असलेल्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरही पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे आगोदरच कमी प्रमाणात सुरु असलेली लोकल सेवा काही काळ ठप्प झाली आहे. तर जसलोक हॉस्पिटल, जेएनपीटी आणि इतर ठिकाणीही तुडंब पाणी साचले आहे. दरम्यान, मुंबई आणि राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी बैठक आयोजित केली आहे.

कुर्ला, सीएसटी परिसरात शाळांमध्ये निवारा केंद्रांची उभारणी- मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे की, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सीएसटी ते कुर्लादरम्यान पालिका शाळांमध्ये तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. असुरक्षित भागातील रहिवाशांना विविधठिकाणी हलविण्यात येत आहे. (हेही वाचा, Mumbai Monsoon Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी अतिअत्यावश्यक काराणासाठी घराबाहेर पडा; अन्यथा घरीच थांबण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन)

महालक्ष्मी रेसकोर्स, जसलोक हॉस्पिटल परिसरात पाणीच पाणी

मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा जसलोक हॉस्पिटल परिसरात मोठा फटका बसला. या ठिकाणी रुग्णालयाचे क्लँडींग कोसळले. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यासोबतच महालक्ष्मी रेसकोर्स इथेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

सांताक्रुझ येथे 8.8 मिलीमिटर पावसाची नोंद

मुंबईतील सांताक्रुझ परिसरात ही मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत या ठिकाणी 8.8 मिलीमिटर तर कुलाबा येथे तब्बल 22.9 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने ही आकडेवारी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

दरम्यान, मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यावर आणि परिस्थितीवर चर्चा करुन उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रातील पावसाचा आढावा घेण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हासह, रायगड, पालघर आणि कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने आणि हा जलाशय या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने न भरल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीची वेळ आली होती. मुंबई महापालिकेने तसा निर्णयही घेतला होता. दरम्यान, या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा जलाशय भरला जाण्याची शक्यता आहे.