IMD Heavy Rain Forecast: कोल्हापूर, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
IMD Heavy Rain Forecast: गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon 2025) ने दडी मारली होती. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रीय होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात मान्सून पुन्हा जोरात परतला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी सहा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rainfall Warning) जारी केला आहे, ज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा - Mumbai Weather Forecast for Today: मुंबई शहर आणि उपनगरात आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता; दुपारी उच्च भरतीचा इशारा)
पेरणींच्या कामाला येणार वेग -
यंदा मान्सूनने राज्यात नियोजित वेळेपेक्षा 12 दिवस आधी आगमन केले. राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यानंतर राज्यभरात मुसळधार पाऊस पडला. ज्यामुळे पेरणीपूर्व शेतीच्या तयारीत व्यत्यय आला. तथापि, पाऊस काही काळ कमी झाला, ज्यामुळे शेतकरी शेतातील काम पुन्हा सुरू करू शकले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना, विशेषतः पेरणीची कामे सुरू करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अनेक प्रदेशांमध्ये शेतीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, शुक्रवारी पुण्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. तथापी, सांगली जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भागातील नद्या आणि नाले भरू लागले आहेत, ज्यामुळे मान्सूनचा जोरदार टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात पेरणीचा हंगाम फलदायी होण्याची आशा पुन्हा जागृत झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)