पुढील 2 दिवसांत कोकणासह मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी; हवामान खात्याचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये विश्रांती घेतलेल्या वरुणराजाचे पूर्नरागमनाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये विश्रांती घेतलेल्या वरुणराजाचे पूर्नरागमनाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
सकाळच्या वेळेस पावसाचे प्रमाण कमी असेल तर रात्रीच्या वेळी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर 26-27 जुलै रोजी मुंबईत दमदार पाऊस बरसेल, अशा इशाराही देण्यात आला आहे. तर 24-25 जुलै रोजी कोकणासह मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी होईल. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊसचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातही पुढील चार दिवसांत वरुणराजाची कृपा होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील 3-4 दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी लागणार आहे. 23 जुलै रोजी कोकणात काही ठिकाणी जोरदार तर 24-25 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.