नाशिक मध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. 24 तासांत तेथे 644 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये 135 मिलीमीटर तर इगतपूरीत 170 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे जागोजागी पाणी साचले असून याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे.