Heavy Rainfall Alert In Mumbai: पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

5 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीच्या मते, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, परंतु गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे झाले होते. आता, विविध प्रदेशांवर, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

Mumbai Weather | X @ANI

Heavy Rainfall Alert In Mumbai: राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसानंतर आज पुण्यात पाऊस झाला. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी सकाळी मुंबई आणि महानगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे बीएमसीच्या आपत्ती व्यस्थापन डॅशबोर्डने म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या आठवड्यात आयएमडीने शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. आपत्ती व्यवस्थापनाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस पडलेल्या भागात हे मुलुंड चेक नाका (75 मिमी), भांडुप कॉम्प्लेक्स (43 मिमी), घाटकोपर (45 मिमी), वडाळा (44 मिमी), मलबार हिल (42 मिमी), लोअर परळ (48 मिमी), दिंडोशी (46 मिमी आणि बोरिवली (50 मिमी) पावसाची नोंद करण्यात आली आहे. तथापि, आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेन सेवा सामान्यपणे सुरू असून कोणत्याही गंभीर वाहतूक कोंडीची नोंद नाही. (हेही वाचा - Mumbai Rains-Weather Forecast: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा काय आहे आजचा हवामान अंदाज)

पुढील 24 तासांत राज्यातील 14 जिल्ह्यांना पावसाचा इशारा -

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी नवीन हवामान अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये येत्या 24 तासांत 14 जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस आणि वादळांचा इशारा देण्यात आला आहे. 5 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीच्या मते, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, परंतु गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे झाले होते. आता, विविध प्रदेशांवर, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव येथे जोरदार वाऱ्यांसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे मध्यम पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांसाठी आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे. येथे मध्यम पावसाची अपेक्षा आहे. पश्चिम विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement