IPL Auction 2025 Live

Navi Mumbai Rain: नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, घरात पाणी शिरले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप; अनेक ठिकाणी वाहने पडली बंद

त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

Photo Credit -X

Navi Mumbai Rain: पहाटेपासून नवी मुंबईतील पनवेल, कळंबोलीमध्ये जोरदार पाऊस कोसळत (Heavy Rainfall)आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. घरात, दुकानांमध्ये पाणी शिरले (Watterlogging In Kalamboli)आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवाशांचे देखील हाल होत आहे. कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. (हेही वाचा:Sindhudurg Rain: मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये तेरेखोल नदीने गाठली धोक्याची पातळी; 27 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप )

कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तेथे पूराचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. नागरिक कामासाठी बाहेर पडल्यास त्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढून जावे लागत आहे. रस्त्यांवर कार, रिक्षा आणि बस बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या पावसामुळे स्थानिक नागरिकांचे देखील हाल होत आहे.

रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. मुंबईला येणारी मँगलोर एक्स्प्रेस अडकली आहे. पडघे, तळोजा, तळोजा एमआयडीसी परिसरात देखील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहत आहे. या पाण्यातून रिक्षा वाहून गेली.