Heatwave Warning For Thane, Mumbai: हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड भागासाठी 27-29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी

या महिन्यातील ही दुसरी उष्णतेची लाट आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि मुंबई मधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) अंदाज वर्तवला आहे. 27 ते 29 एप्रिल पर्यंत ही उष्णतेची लाट असू शकते. IMD scientist Sushma Nair यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागात anti-cyclonic circulation असल्याने तापमानामध्ये वाढ होऊ शकते. 27, 28 एप्रिल दिवशी तापमान उच्चांकावर असण्याची शक्यता आहे. या महिन्यातील ही दुसरी उष्णतेची लाट आहे.

एप्रिल महिन्यातच 15,16 एप्रिल दिवशी देखील नवी मुंबईच्या काही भागात तापमान 41 अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई मध्ये मागील 10 वर्षातील उष्णतेचा विक्रम मोडीत निघाला आहे. सकाळ प्रमाणेच रात्रीच्या वेळेतील देखील उष्णता वाढली असल्याने नागरिक उष्णतेने हैराण आहेत.  नक्की वाचा: Hottest Day in a Decade For Mumbai: मुंबई मध्ये उष्णतेचा मागील 10 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक; ‘Severe Heatwave’ साठी IMD कडून ऑरेंज अलर्ट .

आयएमडी कडून जारी सूचनांमध्ये उन्हात दीर्घकाळ जाणं टाळा, पुरेसे पाणी प्या, हायड्रेटेड रहा, सूती आणि सौम्य रंगाचे कपडे घालाअ, उन्हात बाहेर पडताना डोकं झाका, कपडा, स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच गरज नसल्यास कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.