Heatwave in Maharashtra: महाराष्ट्र तापला, उकाड्याने जीवाची काहीली; राज्यभरातून विजेची मागणी वाढली
त्यानंतर एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात 25 हजार 100 मेगा वॅट वीजेची मागणी झाली. तर मंगळवारी (18 एप्रिल) रोजी महावितरणकडे सुमारे 25 हजार 437 मेगावॅट इतक्या वीजेची मागणी झाली.
अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर आता राज्यात उष्णतेची लाट (Heatwave in Maharashtra) मोठ्या प्रमाणावर जोर धरती आहे. राज्यातील तापमान कामालीचे वाढले असून, उकाड्यामुळे नागरिकांची काहीली होत आहे. अशातच राज्यातील वीजेच्या मागणीतही मोठी वाढ जाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली. केवळ एकट्या राजधानी मुंबई शहरात 3 हजार 678 मेगावॅट इतक्या वीजेची मागणी झाली आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट इतक्या वीजेची मागणी महावितरणकडे नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात 25 हजार 100 मेगा वॅट वीजेची मागणी झाली. तर मंगळवारी (18 एप्रिल) रोजी महावितरणकडे सुमारे 25 हजार 437 मेगावॅट इतक्या वीजेची मागणी झाली.
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे तापमान वाढते आहे. हवामान बदलाचा (Climate Change) फटका सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे जगभरातही उष्णता वाढते आहे. राज्यातील तापमान सरासरी 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. (हेही वाचा, राज्यात एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट इतक्या वीजेची मागणी महावितरणकडे नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात 25 हजार 100 मेगा वॅट वीजेची मागणी झाली. तर मंगळवारी (18 एप्रिल) रोजी महावितरणकडे सुमारे 25 हजार 437 मेगावॅट इतक्या वीजेची मागणी झाली.)
उष्णतेची लाट
उष्णतेची लाट हा असाधारण उष्ण हवामानाचा दीर्घ काळ असतो. ज्यामुळे उच्च तापमान आणि अनेकदा उच्च आर्द्रता होऊ शकते. हे सामान्यत: तापमान वाढल्याने घडते. जे एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी किंवा वर्षाच्या वेळेच्या सरासरी तापमानापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असते आणि ते अनेक दिवस किंवा अगदी आठवडे टिकू शकते.
उष्णतेच्या लाटा मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. खास करुन असुरक्षित लोकसंख्येसाठी जसे की वृद्ध, लहान मुले आणि विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या लोकांसाठी. उष्मा-संबंधित आजारांच्या लक्षणांमध्ये निर्जलीकरण, उष्मा थकवा आणि उष्माघात यांचा समावेश असू शकतो, जे त्वरित उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतात.