HC on Age Of Consensual Sex: लैंगिक संबंधांची वयोमर्यादा भारतात 18 वर्षापेक्षा कमी करण्यासाठी संवैधानिक बदल करण्याची गरज; Bombay High Court चं मत

अशावेळी तो statutory rape मानला जातो.

कोर्ट । ANI

मुंबई उच्च न्यायालयाने जगभरात अनेक देशांमधील सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या वयोमर्यादा पाहता आता भारतामध्येही याबबात बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. यामध्ये संवैधानिक बदल आवश्यक असल्याचं सूचवण्यात आले आहे. न्यायमूर्ती Bharati Dangre यांनी मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हेगारी प्रकरणांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना आपलं हे मत नोंदवलं आहे. एका प्रकरणामध्ये पीडीता किशोरवयीन होती, तिने सहमतीने शारिरीक संबंध ठेवले होते तरीही आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. नक्की वाचा: HC on Consensual Sex With Minor: जर शारिरीक संबंध सहमतीने असेल तर तो बलात्कार असू शकत नाही; कोर्टाने आरोपीला केले Sexual Assault Case मधून मुक्त .

मुंबई उच्च न्यायातील प्रकरण काय?

एका 17 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या आरोपा खाली मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने फेब्रुवारी 2019 मध्ये एका 25 वर्षीय आरोपीला दोषी ठरवले होते. पीडितेच्या दाव्यानुसार मुस्लिम कायद्यानुसार महिला प्रौढ असून तिने सहमतीने आरोपीशी लग्न केलं होतं. शारिरीक संबंधांमध्ये दोघांची सहमती होती. मात्र असं असतानाही आरोपीला दोषी ठरवण्यात आलं. बाल लैंगिक गुन्हे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार या गुन्हेगारी खटल्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त होत आहे. तसेच पुराव्यांवरून दोघांच्याही सहमतीनं त्यांच्यात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्याचं स्पष्ट करत आरोपीला निर्दोष मुक्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिले.

POCSO Act काय सांगतो?

POCSO नुसार, जर एखाद्याचे वय 18 वर्ष पेक्षा कमी असेल आणि कायदेशीररित्या सेक्सच्या सहमतीसाठी लहान मानलं जाणार्‍यांमध्ये ही सहमती कायद्याच्या नजरेतून सहमती नसते. अशावेळी तो statutory rape मानला जातो.

अलीकडेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला महिलांचे वय 16 पर्यंत कमी करण्याची विनंती केली आणि असे निरीक्षण नोंदवले की सध्याचे 18 वर्षे हे समाजाच्या जडणघडणीला त्रासदायक ठरत असल्याचं म्हटलं आहे.

भारतामध्ये सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्याचे वय 18 वर्ष आहे. पोक्सो अंतर्गतही हेच वय आहे. परंतू जागतिक पातळीवर विचार करतात इतर देशांच्या तुलनेत भारतात हे वय सर्वाधिक आहे. जगात अनेक ठिकाणी ही वयोमर्यादा 13 ते 16 या वयोगटात आहे. आशिया खंडात जपान मध्ये सहमतीने शारिरीक संबंधांची किमान वयोमर्यादा 13 वर्ष आहे. श्रीलंका, बांग्लादेश मध्ये हे वय 16 वर्ष आहे.