Hathras Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन येथील पोलिसांना तपसाणीला पाठवावे; प्रताप सरनाईक यांची अनिल देशमुख यांना विनंती

प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात यावा.

प्रताप सरनाईक (Photo Credits-Facebook)

Hathras Case: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित कुटुंबातील एका मुलीवर 4 नराधामांकडून सामूहिक बलात्कार केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी ही मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे राजकिय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांचे हृदय पिळवटून टाकेल अशी अवस्था पहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  यांनी एक ट्विट केले आहे. प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात यावा.

सरनाईक यांनी ट्विट मध्ये असे ही म्हटले आहे की, देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसून येत आहेत. मुंबईत यावर गुन्हा दाखल करुन येथील पोलिसांनी तेथे तपासणीसाठी पाठवावे अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.(काँग्रेस खासदार राहुल गांधी Hathras येथे पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघाल्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे राज्यातील नेते मंडळींकडून निषेध व्यक्त; पहा ट्विट्स)

दरम्यान, हाथरस येथे पीडिता जनावरांचा चारा आणण्यासाठी गेली असता तिच्यावर 4 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. ऐवढेच नाही तर ही कृ्त्य केल्यानंतर तिचा अमानुष छळ करत तिची जीभ कापली, पाठीचा कणा मोडला अशा गोष्टी ही तिच्यासोबत केल्या. यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अखेर पीडितेचा मृत्यू झाला.(Anil Deshmukh on Hathras Gangrape: इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या राज्यातील 'जंगल राज' विरुद्ध कारवाई करा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची UP CM योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका)

तसेच पीडितेचा मृतदेह परिवाराला न देता पोलिसांनी परस्पर त्यावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप लावण्यात येत आहे. या सर्व एकूणच प्रकारामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहेच. पण उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या सरकारला नेमके काय लपवायचे आहे असा सवाल सुद्धा आता उपस्थितीत केला जात आहे.