Hasina Begum Passes Away: हसिना बेगम यांचे निधन, तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानच्या कोठडीतून परतल्या होत्या भारतात
पाकिस्तानमध्ये लाहोर येथे त्यांचा पासपोर्ट हरवला. त्यांनतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली. धक्कादायक म्हणजे कोणताही गुन्हा नसताना पाकिस्तान सरकारने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल 18 वर्षे तुरुंगात ठेवले.
पाकिस्तानच्या कोठडीत (Pakistan jail) 18 वर्षे राहिल्यानंतर प्रथमच भारतात परतलेल्या हसिना बेगम (Hasina Begum) यांचे निधन (Hasina Begum Passes Away) झाले आहे. त्या 65 वर्षांच्या होत्या. मायभूमी औरंगाबद येथे त्यांचे निधन झाले. नमाजे जनजा रशीदपुरा येथील मोहंमदीया मस्जिदमध्ये आज (मंगळवार, 9 फेब्रुवारी) दुपारी नमाज जोहरमध्ये अदा करण्यात आली. इतक्या वर्षांनी मायभूमीत परतल्यावर अवघ्या 15 दिवसांमध्येच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुळच्या त्या औरंगाबाद येथील राशीदपुरा येथील रसिवासी होत्या.
आपल्या पतीच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी म्हणून त्या पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. पाकिस्तानमध्ये लाहोर येथे त्यांचा पासपोर्ट हरवला. त्यांनतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली. धक्कादायक म्हणजे कोणताही गुन्हा नसताना पाकिस्तान सरकारने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल 18 वर्षे तुरुंगात ठेवले. (हेही वाचा, औरंगाबाद: पासपोर्ट हरवल्याने पाकिस्तानच्या जेल मध्ये 18 वर्ष रहावं लागलेल्या 65 वर्षीय Hasina Begum मायदेशी परतल्या, म्हणाल्या 'स्वर्गात आले'!)
दरम्यान, अनेक वर्षे हे प्रकरण तसेच प्रलंबित होते. हसीना बेगम बेपत्ताच होत्या. त्यांची कुणालाही माहिती नव्हती. अखेर काही वर्षांनी औरंगाबाद हसीना बेगम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. नंतर हे प्रकरण पुढे आले. औरंगाबाद पोलिसांनी या संदर्भात शोध घेतला. औरंगाबाद येथील घराची कागदपत्रे, रिवासी असल्याचे पुरावे आणि इतर आवश्यक त्या गोष्टी परराष्ट्र मंत्रालयाला दिल्या. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली आणि हसीना बेगम यांचे भारतात आगमन झाले.
हसीना बेगम यांच्या प्रकरणात असेही सांगितले जाते आहे की, हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या न्यायायलात विनंती केली की त्या निर्दोष आहेत. न्यायालयाने हसीना बेगम यांची विनंती ऐकून भारतीय पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी ओरंगाबाद पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेला वेग आला आणि हसीना बेगम भारतात परतल्या.