Gunaratna Sadavarte Death Threat: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचा कॉल; 'बिग बॉस 18' च्या घरात दिसणार?

गुणरत्न सदावर्ते यांना काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतरही अशाच प्रकारचा धमकीचा फोन आल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.

Gunratna Sadavarte | (File Image)

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेणार आहेत. विविध कारणांवरून चर्चेत असलेल्या सदावर्ते यांना धमकीचा कॉल आला आहे. हा कॉल निनावी होता. दरम्यान  गुणरत्न यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी भोईवाडा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिजामाता नगर संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आणि आगामी विधानसभा निवडणूकीसाठी वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे.  त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर  धमकीचा कॉल आला आहे. सदावर्तेंना आलेला हा जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल एका इंटरनॅशनल नंबर वरून आला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध निवडणूकीत उतरण्याची इच्छा  सदावर्ते यांनी महायुती कडे व्यक्त केल्यानंतर आपण 25 हजारांच्या लीडने जिंकून येणार असल्याचा विश्वास देखील बोलून दाखवला आहे. वरळी मध्ये जिजामाता नगर येथील 8000 झोपडीवासियांचा विकास करणार असुन त्यांना 600 स्क्वेअर फुटाचे घर देणार आणि एक मोठं रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी तयार करणार असेही सदावर्ते म्हणाले होते.

गुणरत्न सदावर्ते यांना काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतरही अशाच प्रकारचा धमकीचा फोन आल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. नक्की वाचा: Gunratna Sadavarte and Bigg Boss: आई शप्पतच! 'डंके की चोटपर', गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री.  

गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉस मधील एक सदस्य असणार का? याची उत्सुकता आता आहे. उद्या 6 ऑक्टोबर पासून बिग बॉस हिंदी सिझन 18 सुरू होत आहे. या खेळामध्ये ते स्पर्धक म्हणून ते दिसणार असल्याची चर्चा आहे.