Gulshan Kumar Murder Case: गुलशन कुमार हत्या प्रकरणात अब्दुल राशिद दाउद मर्चेंट यास जन्मठेप

अब्दुल राशिद दाउद मर्चेंट (Abdul Rashid Dawood Merchant) याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

Gulshan Kumar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार (Gulshan Kumar ) हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आरोपी अब्दुल राशिद दाउद मर्चेंट याला दोषी ठरवले आहे. अब्दुल राशिद दाउद मर्चेंट (Abdul Rashid Dawood Merchant) याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. न्यायाधीश जाधव आणि न्यायाधीश बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. गुलशन कुमार हत्या प्रकरणात आरोपी अब्दुल राशिद दाउद मर्चेंट याला भारतीय दंड संहिता कलम 302, 307 आणि 34 अन्वये दोषी ठरविण्यात आले.कॅसेट किंग आणि T-Series कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांची 12, ऑगस्ट 1997 मध्ये हत्या करण्यात आली होती.

मुबई शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या जुहू येथील जीत नगर (Jeet Nagar) परिसरातील घरातून बाहेर पडताना गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. गुलशनकुमार हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अब्दुल रउफ (Abdul Rauf) याने त्याची शिक्षा आणि जन्मठेप यांबाबत न्यायालयात आव्हान दिले होते. ट्रायल कोर्टात निर्दोष ठरलेल्या आरोपी अब्दुल राशिद दाउद मर्चेंट (Abdul Rashid Dawood Merchant) याची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने त्यास दोषी ठरवले. हत्या, हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

एएनआय ट्विट

गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणात दोषी असलेला आरोपी अब्दुल राशिद दाउद मर्चेंट सध्या फरार आहे. कारागृहातून तो पॅरोलवरती बाहेर आला होता. तेव्हापासून तो फरार झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अब्दुल राशिद दाउद मर्चेंट याला एक आठवड्याच्या आत मुंबई पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणे आवश्यक आहे. जर अब्दुल राशिद दाउद मर्चेंट याने आत्मरमर्पण केले नाही तर त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाईल. तसेच, त्याची रवानगी कोठडीत करण्यात येईल.