Gulabrao Patil On Gaddari: गद्दारी केल्याचे कबूल; गुलाबराव पाटील यांनी जाहीरच सांगितले, म्हणाले 'होय मी गद्दारी केली' (Watch Video)
एकदम ओके..' (Pannas Khoke, Ekdam Okay) ही घोषणा महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचली आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीला गद्दारी असे संबोधन्यात आले. उद्धव ठाकरे गट आजही या 40 आमदारांना गद्दार असेच संबोधतो.
'पन्नास खोके.. एकदम ओके..' (Pannas Khoke, Ekdam Okay) ही घोषणा महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचली आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीला गद्दारी असे संबोधन्यात आले. उद्धव ठाकरे गट आजही या 40 आमदारांना गद्दार असेच संबोधतो. दरम्यान, आमदारांना गद्दार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंडात सहभागी असलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी चक्क आपल्या गद्दारीची कबुली दिली आहे. त्यांनी एकाजाहीर भाषणात स्पष्ट कबुली देत म्हटले आहे की, 'होय, मी गद्दारी केली. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. आज, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसतो यातच मतदारसंघाचा जयजयकार आहे,' असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. आजवर एकनाथ शिंदे गट नेहमीच सांगत आला आहे की, आम्ही गद्दार नाही आहोत. आम्ही बंडखोर आहोत. आम्ही गद्दारी नव्हे तर उठाव केला आहे. दरम्यान, खरी शिवसेना आम्हीच हा दावाही शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला. निवडणूक आयोगानेही मग हा दावा मान्य करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बहाल केली. त्यामुळे आगोदरच अनेक तर्कवितर्क सुरु असताना आता थेट गुलाबराव पाटील यांचा खुलासा आला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयतील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला)
नेमके काय म्हटले गुलाबराव पाटील?
होय आम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदे मराठा आहे, त्यांच्यासाठी मी हा त्याग केला. गद्दारी केली. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, ह्यातच मतदारसंघाचा जयजयकार आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
व्हिडिओ
कोणता दावा खरा?
सूरतमार्गे गुवाहाटीला पोहोचलेला शिंदे गट गोवा मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला. या गटाने महाराष्ट्रात दाखल होताच आपण महाविकासआघाडीमध्ये असमाधानी होतो. शिवसेना आमदारांना राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या अर्थमंत्रालयाकडून योग्य तो निधी मिळत नव्हता. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्त्व सोडले, असे विविध दावे केले होते. दरम्यान, या सर्वांपलीकडे जात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता शिंदे गटाचा कोणता दावा खरा मानायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.