Mumbai: मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांचे महत्वाचे वक्तव्य

ज्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. मात्र, आता मुंबईतील रुग्ण संख्या अटोक्यात येत आहे.

Mumbai Guardian Minister Aslam Sheikh (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील (Mumbai) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली होती. ज्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. मात्र, आता मुंबईतील रुग्ण संख्या अटोक्यात येत आहे. यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात यावे, अशा मागणींनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध शिथिल करण्यासंबंधी पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी महत्वाचे विधान केले आहे. दरम्यान 70 टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वकाही सुरु करता येणार नाही, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

अस्लम शेख यांनी नुकताच एबीपी माझाशी वृतवाहिनीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईतील निर्बंध शिथिलता निर्बंध करण्याबाबत भाष्य केले. म्हणाले की, “जोपर्यंत लसीकरण 60 ते 70 टक्के पुर्ण होत नाही. तोपर्यंत सर्व खुले करणे योग्य ठरणार नाही. ज्या पद्धतीने सुट देता येईल ते आम्ही देतच असतो. याशिवाय, त्यांनी मुंबईसह नजीकच्या शहरात लसीकरण करणे गरजेचे असल्याचे अस्लम शेख म्हणाले आहे. हे देखील वाचा- Kishori Pednekar: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईतील रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी 402 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 577 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 14 जणांनी प्राण गमावले आहेत. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत 15 हजार 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत मृतांच्या प्रमाणातही घट झाली आहे.