धक्कादायक! आजोबाने केली 7 वर्षाच्या नातवाची धारधार विळ्याने हत्या; परभणी जिल्ह्यातील घटना
आजोबानेचं आपल्या 7 वर्षाच्या नातवाची धारधार विळ्याने पोटात वार करून हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिगंबर जाधव, असं या आरोपी आजोबाचं नाव आहे. नातवाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दिगंबर जाधव याला अटक केली आहे.
परभणी (Parbhani) जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्यातील चिकलठाणा बुद्रुक येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आजोबानेचं आपल्या 7 वर्षाच्या नातवाची धारधार विळ्याने पोटात वार करून हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिगंबर जाधव, असं या आरोपी आजोबाचं नाव आहे. नातवाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दिगंबर जाधव याला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत चिमुरड्याचं नाव अभिराज श्रीराम जाधव, असं आहे. अभिराज आपल्या घरासमोर खेळत होता. दरम्यान, त्यावेळी त्याचे चुलत आजोबा दिगंबर जाधव त्या ठिकाणी आले. त्यांनी अभिराजचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील धारदार विळ्याने त्याच्या पोटावर वार केले. (हेही वाचा - धक्कादायक! Thane येथे 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांचा व प्रियकराचा बलात्कार; आरोपींना अटक, गुन्हा दाखल)
दरम्यान, धारदार विळ्याने वार केल्याने अभिराजच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अभिराजच्या घरच्यांनी त्यांना तात्काळ सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अभिराजचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी आजोबाला अटक केली आहे. (वाचा - मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन महिलांना अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 27 वर्षीय व्यक्तीला अटक)
काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्येदेखील आजोबाने नातवाचा खून केल्याची घटना घडली होती. आजोबाने दारुसाठी वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या नातवाची हत्या केली होती. अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारात ही घटना घडली होती. विशेष म्हणजे आरोपी आजोबाने खूनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी नातवाच्या मृतदेहाचे 9 तुकडे केले होते. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरून शिवारातील नदीजवळ टाकला होता.