Crime: तीन हजार रुपयांवरून झालेला वाद पोहोचला विकोपाला, नातवाकडून आजोबांची हत्या
मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) सांगितले की प्राथमिक तपासानंतर असे समजले की मृत लक्ष्मण कानुजी घुगे याने आरोपीला आधी घेतलेले ₹ 3,000 परत करण्यास सांगितले होते.
आजोबांची डोक्यात बांबूने वार करून हत्या (Murder) केल्याप्रकरणी पनवेलमधून (Panvel) एका 22 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) सांगितले की प्राथमिक तपासानंतर असे समजले की मृत लक्ष्मण कानुजी घुगे याने आरोपीला आधी घेतलेले ₹ 3,000 परत करण्यास सांगितले होते. आरोपी सुशांत राम सातपुते हा लक्ष्मण कनुजी घुगे यांचा नातू असून तो नेरूळ येथे त्याच्या आई-वडिलांसह नवी मुंबई येथे राहतो. तो अमली पदार्थांचे व्यसनी असून गांजा पितो. त्याच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की त्यांनी त्याला काही महिन्यांपूर्वी ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवले होते पण तो पळून गेला आणि घरी परतला, असे प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले.
सातपुते यांनी 8 फेब्रुवारी रोजी वडाळा येथील घुगे यांच्या घरी जाऊन रात्रीचा मुक्काम केला होता. सकाळी घुगे याने आरोपीला पैसे परत करण्यास सांगितले त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला, असे पवार यांनी सांगितले. रागाच्या भरात आरोपीने घरातून बांबू उचलून आजोबांच्या डोक्यात अनेक वार केले आणि बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केले. सकाळच्या भांडणाची माहिती शेजाऱ्यांनी सातपुतेच्या कुटुंबीयांना दिली. हेही वाचा Valentine's Day: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बागेत बाबू-शोना दिसले तर लाठ्या-काठ्यांनी पूजा होणार, मध्य प्रदेशात शिवसेना आक्रमक
त्यानंतर आरोपीची आई आणि आजी नेरुळहून वडाळा येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरी आल्या आणि त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, पवार म्हणाले. तिने शेजाऱ्यांसह घुगे यांना जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन केले आणि आरोपी वडाळा स्टेशनच्या दिशेने गेल्याचे आढळले.
रेल्वे स्थानकावरील कॅमेरे तपासले असता ते पनवेलकडे निघाले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले आणि त्याला भायखळा येथील युनिटच्या कार्यालयात आणण्यात आले, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर आरोपीला वडाळा पोलिस ठाण्यात सोपवण्यात आले, जिथे त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, अशी माहिती पवार यांनी दिली.