Grampanchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणूक निकाल; 15 जिल्ह्यांपैकी 62 तालुक्यांतील 238 गावांमध्ये अनेकांना विश्वास 'गुलाल आपलाच'

असे असले तरी आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा राडा काहीसा शांत झाल्याने पुन्हा एकदा या धुरळ्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरात झालेल्या जवळपास 238 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (5 ऑगस्ट) पार पडत आहे.

Grampanchayat (File Image)

राज्यातील सत्तांतराच्या राड्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 (Gram Panchayat Election Result) चा धुरळा काहीसा झाकोळला गेला. असे असले तरी आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा राडा काहीसा शांत झाल्याने पुन्हा एकदा या धुरळ्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरात झालेल्या जवळपास 238 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (5 ऑगस्ट) पार पडत आहे. आज पार पडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 साठी मोठी उत्सुकता आहे. अर्थात, राज्यभरात जून महिन्यामध्येच एकूण 271 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, त्यापैकी जवळपास 33 ग्रामपंचायती पूर्णत: किंवा अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत 238 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. खास करुन राज्यात झालेले सत्तांतर, ओबीसी आरक्षणाचा पेच आणि इतर सर्वच घडामोडींमुळे ग्रामीण जनतेच्या मनात काय याबाबत उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांपैकी 62 तालुक्यांमध्ये असलेल्या 238 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. या निवडणुकांसाठी काल म्हणजेच 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज (5 ऑगस्ट 2022) लगेच मतमोजणी पार पडत आहे. त्यामुळे उत्सुकता ताणायला फार कारण राहणार नाही. राज्यात ग्रामपंचायतींसाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत साधरण 78% मतदान पार पडले आहे. (हेही वाचा, Gram Panchayat Election 2022: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी)

मतादन पार पडलेल्या ग्रामपंचायती (जिल्हानिहाय)

नाशिक- 36

धुळे- 41

जळगाव- 20

अहमदनगर- 13

पुणे- 17

सोलापूर- 25

सातारा- 7

सांगली- 1

औरंगाबाद- 16

बीड- 13

परभणी- 2

उस्मानाबाद- 9

जालना- 27

लातूर- 6

बुलडाणा- 5

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक चांगली प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्व असते. ग्रामीण भागातील ऋणानूबंध, हेवेदावे, छक्केपंजे अशा सर्व गोष्टींचे मिश्रण पाहायला मिळते. म्हणजेच काय तर एकूण गावगाडा पाहायला मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. उत्सुक असलेल्या अनेकांना यंदा 'गुलाल आपलाच' असा विश्वास आहे.