Gram Panchayat Election 2021: 70 वर्षांच्या आजीबाई ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध; चिपळूण तालुक्यात 83 ग्रामपंचायतींसाठी 1 हजार 224 उमेदवारी अर्ज

एकट्या चिपळून तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 1 हजार 224 उमेदवारी अर्ज आले आहेत. या अर्जांपैकी छाननीवेळी एकूण 9 अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंच्यात निवडणुकीसाठी एका 70 वर्षांच्या अजीबाईंनीही अर्ज भरला आहे.

Gram Panchayat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. एकट्या चिपळून तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 1 हजार 224 उमेदवारी अर्ज आले आहेत. या अर्जांपैकी छाननीवेळी एकूण 9 अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंच्यात निवडणुकीसाठी एका 70 वर्षांच्या अजीबाईंनीही अर्ज भरला आहे. महत्त्वाचे असे की, या आजीबाई बिनविरोध निवडूण आल्या आहेत. विजया सुदाम गमरे असे या आजीचे नाव आहे.

चिपळून तालूक्यातील पलवली ग्रामपंचायतींसाठी एकूण 7 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. जागांपैकी येथून वेळंब येथून केवळ 2 अर्ज आले आहेत. त्यापैकी एक अर्ज विजया सुदाम गमरे यांचा असून त्या बिनविरोध निवडूण आल्या आहेत. उर्वरीत जागांसाठी फारसे कोणी गंभीर नसल्याचे पुढे येत आहे. पलवली येथून फारशा तक्रारी नसतात. त्यातच वेळंब येथून

दरम्यान, चिपळून तालूक्यात दाखल झालेल्या 1 हजार 224 उमेदवारी अर्जांपैकी 1213 अर्ज वैध ठरले आहेत. हे अर्ज 83 ग्रामपंचायतींसाठी आहेत. ज्या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले त्यात आकले, अनारी, निरबाडे, तोंडली, निवळी, वडेरू (2), आगवे या गावांचा समावेश आहे. तसेच, हे अर्ज छाननीत बाद होण्यामागे दोन पेक्षा अधिक अपत्ये असणे. कागदपत्रातील त्रुटी असणे तसेच इतर काही तांत्रिक कारणे आहेत. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Election 2021: राज्यातील 34 जिल्ह्यांत 14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान, 18 तारखेला मतमोजणी)

निवडणूक होणाऱ्या राज्यभरातील ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif