Monsoon and Inflation: मान्सून लांबल्याने अन्नधान्यांच्या किमतीत वाढ, सामान्यांच्या खिशावरील भुर्दंड वाढण्याची शक्यता; सरकारकडून उपाययोजना सुरु
सर्वसामान्य लोकांना याचा परिणाम भोगावे लागणार आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार येता काळ हा महागाईचा असणार आहे. जीवनाश्यक वस्तूवर देखील परिणाम होणार आहे.
Inflation: पावसाने यंदा बराच उशीर केल्यामुळे शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य जनतेला यांचा चांगलाच फटका बसणार आहे. मान्सून लांबल्यामुळे सर्वांना याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. पाऊस लांबल्यामुळे अन्नधान्यांच्या किंमतीवर परिणाम होताना दिसत आहे. काही राज्यात काल पासून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. वस्तूच्या किंमतीच चांगलेचे भाव वाढले आहे. सकरकाने या संदर्भात सर्वसामान्याचा विचार करत पाउले उचलली आहेत. महागाईमुळे FMCG (Fast Moving Consumer Goods) ह्या क्षेत्रावर फटका बसू शकतो.
खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ
सरकार नियमितपणे ह्या संदर्भात पाउले उचलत आहेत.खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मान्सून लांबणीमुळे शेतकऱ्यांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. सरकार कडून यासंदर्भात लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. चांगल्या पावसामुळे शेतमालाला चांगली किंमत मिळाली असती परंतू मान्सूनने यंदा जून महिन्यात दडी मारली आहे. सरकार खाद्य पदर्थांच्या पाठपुरवठ्याबाबत योग्य ते उपाययोजना करायला सुरुवात केली.देशात महागाई वाढली त्याचे मुख्य कारण म्हणजे एल निनो.
सरकारने उचलेले 'हे' पाउल
सणासुदीच्या आधी पुरवठा वाढवला जाईल याची दक्षता सरकार घेत आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून पेरणीपासून किती उत्पादन होईल यांचा अंदाजिक डेडा गोळा केला जात आहे. सरकार अन्नधान्याचा साठा वाढवण्यासाठी नियोजन करत आहेत. येत्या काळात साखर, हरभरा,मैदा, डाळ, तांदूळ यांच्या मागणी भर वाढणार आहे. सणासुदीच्या काळात यांचा तुटवडा होवू नये याबाबत सरकार कार्यरत आहे. सर्वसामान्य लोकांना एल निनो मुळे महागाईला तोंड द्यावे लागेल.
येता काळ हा महागाईचा असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा परिणाम भोगावे लागतील. भाज्या, खाद्यपदार्थ आणि जीवनाश्यक वस्तूंवर किंमत वाढणार असल्याचे तज्ज्ञानी सांगितले आहे.