राज्यपाल नियुक्त आमदार शपतविधी: चित्रा वाघ, मनीषा कायंदे, पंकज भुजबळ यांच्यासह 7 जणांना संधी

सभागृहाच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, मनीषा कायंदे, हेमंत पाटील, पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांचा समावेश आहे.

Mahayuti | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यपाल नियुक्त 12 पैकी सात सदस्यांनी (Governor-appointed MLAs) आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपच्या तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येकी दोन सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधानपरिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ही शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरुन एक प्रकरण आगोदरच न्यायालयात प्रलंबीत आहे. हे प्रकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने 12 नावे राज्यपालांकडे दिली होती. ज्यावर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. दरम्यान, आगोदरच्या सरकारने दिलेली यादी पाठिमागे घेऊन या विद्यमान राज्य सरकारने पुन्हा एकदा नवा नवी नावे राज्यपालांकडे सादर केली होती. ज्यावरुन आता शिवसेना पुन्हा एकदा न्यायालयात गेल्याचे समजते.

राज्यपालनियुक्त आमदार म्हणून शपथ घेतलेले विधान परिषद सदस्य खालील प्रमाणे:

भाजपकडून आमदार पदासाठी तीन चेहरे

राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ घेतलेल्या चित्रा वाघ या पूर्वाश्रमीच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. खास करुन महिलांविषयीचे प्रश्न त्यांनी विशेषत्वाने हाती घेतले. (हेही वाचा, MVA On CM Face: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत थेटच सांगितले)

विक्रांत पाटील हे देखील भाजपमध्ये प्रदीर्घ काळापासून आहेत. त्यांनी देखील भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. याशिवाय बाबूसिंग महाराज राठोड यांनी देखील आमदार म्हणून शपथ घेतली आहे. ते वाशिममधील पोहरादेवी शक्ती पीठाचे महंत आहेत. या पदाच्या माध्यमातून भाजपने बंजारा समाजास आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोघांना संधी

मनिषा कायंदे आणि हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून आमदारकीसाठी संधी मिळाली आहे. मनिशा कायंदे या वकील असून प्रदीर्घ काळ त्या शिवसेनेत राहिल्या आहेत. तत्पूर्वी त्या भाजपमध्ये होत्या. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या. दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी विश्वास दाखवला असून त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार केले आहे. (हेह वाचा, Uddhav Thackeray Dasara Melava 2024: "अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान" उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका)

दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. त्यापैकी पंकज हे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. तर इद्रिस नायकवडी हे सांगिलीचे महापौर राहिले आहेत. या दोन्ही नेत्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भोगौलिक तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.