मराठा आरक्षण: विधानसभेत विधेयक दाखल होण्याची शक्यता; सत्ताधारी शिवसेना, भाजप आमदारांना व्हिप जारी
या पार्श्वभूमिवर विरोधक किंवा काही प्रमाणात स्वपक्षियांकडूनही होणारा दगाफटका टाळण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने आपापल्या आमदारांना व्हिप जारी केले आहेत.
Maratha Reservation Bill: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन संपण्यास शेवटचे अवघेत तीन दिवस बाकी असताना राज्य सरकार मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात आज (बुधवार, २८ नोव्हेंबर) मांडण्याची शक्यता आहे. अधिवेशन अंतिम टप्प्यात असल्याने इतरही अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमिवर विरोधक किंवा काही प्रमाणात स्वपक्षियांकडूनही होणारा दगाफटका टाळण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने आपापल्या आमदारांना व्हिप जारी केले आहेत. हे व्हिप आगामी तीन दिवसांसाठी असणार आहेत. त्यामुळे व्हिप जारी केलेल्या सर्वच आमदारांना सभागृहात उपस्थित असणे बंधनकारक असणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी त्याबाबतचा कृती अहवाल आगोदर विधिमंडळाच्या पटलावर मांडाल जाईल. त्यानंतरच विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंगळवारीही (27 नोव्हेंबर) पार पडली. या बैठकीत आरक्षणावर पुन्हा एकदा चर्चा झाली. तसेच, एकूण १६ टक्के आरक्षणावर समितीचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, मराठा आरक्षण: आम्ही आरक्षण देऊच पण, विरोधकांच्याच मनात खोट: मुख्यमंत्री)
दरम्याण, विधिंडळ अधिवेशन कालावधीत दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. या वेळी सभागृहात मोठा गदारोळही पाहायला मिळाला. गेले वर्षभर मराठा समाजाकडून हजारोंच्या संख्येने निघत असलेले मूक मोर्चे. त्यानंतर राजकीय पक्षांची विविध मत-मतांतरे. सरकार आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अशा अनेक प्रवाहातून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत राहिला आहे. अखेर आज हे विधेयक विधिमंडळात येण्याची शक्यता आहे. त्याबाबत सभागृह काय निर्णय घेते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.