Free ST Bus Service: ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! आता 75 वर्षांवरील नागरिकांना ST ने मोफत प्रवास करता येणार; 'या' लोकांनाही मिळणार 50 टक्के सूट

या मोफत प्रवास योजनेसाठी पात्र असलेल्यांनी 26 ऑगस्टपूर्वी त्यांचे तिकीट बुक केले असल्यास त्यांना भाड्याचा परतावा मिळेल.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

Free ST Bus Service: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने म्हटले आहे की, शुक्रवारपासून 75 वर्षांवरील लोक बसमधून विनामूल्य प्रवास करू शकतात. MSRTC च्या रिलीझमध्ये राज्य-चालित परिवहन उपक्रमाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांच्या हवाल्याने म्हटले आहे की,, या मोफत प्रवास योजनेसाठी पात्र असलेल्यांनी 26 ऑगस्टपूर्वी त्यांचे तिकीट बुक केले असल्यास त्यांना भाड्याचा परतावा मिळेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ट्विट करून या योजनेची माहिती दिली. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीकडून मोफत प्रवास योजनेचे प्रमाणपत्र आज वितरित करण्यात आले. देशातील अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील सुमारे दीड लाख ज्येष्ठ 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळणार आहे.” (हेही वाचा - Toll Free Travel to Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा)

याशिवाय, 65 ते 75 वर्षे वयोगटातील लोकांना उपक्रमाद्वारे चालवल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या बस सेवांवर तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत मिळेल. त्यांना आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारखी ओळखपत्रे दाखवून मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेता येईल.

एमएसआरटीसीच्या शहर बससाठी ही सुविधा उपलब्ध नसून ती केवळ राज्याच्या हद्दीतील प्रवासासाठी असेल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या नव्या सुविधेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif