मध्य रेल्वे प्रवाशांना देणार नववर्षाची भेट; 66 नव्या सेवा तर, 49 सेवांचा विस्तार!
मध्य रेल्वे मार्गावर नव्या विविध ठिकाणी 206 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. यातील 24 इएमयू कॅमेरे महिलांच्या डब्यात लावण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे (Central Railway) 2019 या नव्या वर्षात मुंबईकरांसाठी एक खुशखबर घेऊन येत आहे. ही खशखबर खास करून मध्य रेल्वे प्रवाशांसाठी आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षात मध्य रेल्वे मार्गावर नव्या 66 उपनगरीय सेवा (Suburban Services) वाढविण्यात येणार आहेत. तर, आगोदरच सुरु असलेल्या तब्बल 49 सेवांचा विस्तार करणार आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
नव्या सेवेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या उपनगरीय सवा सुरु केल्याने आणि आगोदरच सुरु असलेल्या सेवांचा पुढे अधिक विस्तार केल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. तसेच, रेल्वे वाहतूक सेवेवर येणारा ताण कमी होईल. ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करणारे प्रवासीही जादा गाड्यांची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनाही नव्या वर्षात भेट मिळणार आहे. या मार्गावरही 10 नव्या सेवा सुरु करण्यात येणार आहेत. (हेही वाचा, धुक्यामुळे उशिरा धावणार्या रेल्वे फेर्यांवर मध्य रेल्वेचा तोडगा, वेळापत्रकात होणार बदल)
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीनेही मध्य रेल्वे मार्ग अधिक सक्षम होताना दिसतो आहे. मध्य रेल्वे मार्गावर नव्या विविध ठिकाणी 206 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. यातील 24 इएमयू कॅमेरे महिलांच्या डब्यात लावण्यात येणार आहेत. तसेच, अपघात टाळण्यासाठी मंबईतील अनेक फलाटांची उंचीही 900मीमी पर्यंत वाढवण्यात येणार आहे.