Gondia: दोन ट्रकचा भीषण अपघात,चार जणांचा मृत्यू
दोन ट्रकची समोरासमोर येऊन जोरात धडक झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली आहे.
Gondia: दोन ट्रकची समोरासमोर येऊन जोरात धडक झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. तसेच या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
देवरी तालुक्यातील सिरपूर सीमा तपासणी नाका येथून हे ट्रक रायपूरकडून नागपूर आणि देवरीवरुन रायपूरकडे जाच होता. या मार्गावरुन जात असताना दोन्ही ट्रकची समोरासमोर येऊन जोरात धडक बसली आणि भीषण अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहचून घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु केली.
या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृत व्यक्तींपैकी दोघांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2018 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

