Gold-Sliver Rate Today: मुंबई, पुण्यामध्ये सोने झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहे आजचा दर
मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात (Gold Rate) 1600 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात (Silver Rate) 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालंय.
मुंबई (Mumbai) आणि पुणेकरांसाठी (Pune) दिलासादायक बातमी! सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहून लग्नघरातील मंडळीची चांगलीच पंचाईत झाली होती. अशातच आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली गोष्ट घडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झालेली पाहायला मिळाली. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात (Gold Rate) 1600 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात (Silver Rate) 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,760 रुपये इतका आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या दरातही 700 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत चांदीचा दर 65,000 रुपये प्रति किलो इतका आहे. हाच दर शुक्रवारी 65,700 रुपये इतका होता.हेदेखील वाचा- Gold Rate Today: आज सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, पहा आजचा भाव!
महिन्याभरापूर्वी मुंबईत (Mumbai) 24 कॅरेट सोन्याचे (@4 Carat Gold) दर प्रति तोळा 47,150 रुपये इतके आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) भाव प्रति तोळा 46,150 रुपये इतका आहे. तर नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 50,420 रुपये इतका झाला आहे.
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.