Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर जाहीर, जाणून घ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे भाव

सोन्याचे मूळ दर वेगळे असतात. यात जीएसटीसह विविध राज्यांचे आणि स्थानिक महसूल दरांचा समावेश झाल्याने हे दर बदलू शकतात. त्यामुळे अचूक सोने दर समजून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सोनार, अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधणे केव्हाही चांगले. जाणून घ्या राज्यातील विविध शहरांतील आजचे सोने दर.

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर जाहीर, जाणून घ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे भाव
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दररोज बदलणाऱ्या सोने-चांदी दर (Gold Price Today) यांबाबत तुम्ही उत्सुक असाल तर आजचा दर तम्ही जाणून घेऊ शकता. आज 22 कॅरोट प्रति10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,610 रुपये इतकी आहे. पाठीमागच्या ट्रेंडमध्ये हाच मौल्यवाण धातू 46,600 रुपये प्रती 10 ग्रॅमवर बंद झाला होता. गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार चांदी (Silver Rate) प्रति किलो 60,700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. अर्थात हे सर्व दर सोन्याचे मूळ दर असतात. यात जीएसटीसह विविध राज्यांचे आणि स्थानिक महसूल दरांचा समावेश झाल्याने हे दर बदलू शकतात. त्यामुळे अचूक सोने दर समजून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सोनार, अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधणे केव्हाही चांगले. जाणून घ्या राज्यातील विविध शहरांतील आजचे सोने दर.

खाली दिलेले सर्व दर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आहेत. वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदी दर

मुंबई

22 कॅरेट- 46,610 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 48,610 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट- 45,850 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 48,650 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट- 46,610 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 48,610 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी दर प्रती 10 ग्रॅम 607 रुपये)

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2022 10:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).