Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Gold Price Today: नववर्ष 2022 मध्ये सोने, चांदी दर (Gold Silver Rate) कसे राहतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान, नववर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी मात्र, सोने दर किंचितसे घसरले तर चांदी त्या तुलनेत काहीशी वधारल्याचे पाहायला मिळाले. 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम सोन्याची आजची (2 जानेवारी) किंमत 47,150 रुपये आहे. पाठिमागील ट्रेडमध्ये हीच किंमत प्रति 10 ग्रॅम 47,010 रुपयांवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स हे संकेतस्थळ नेहमी सोने, चांदी दर जाहीर करत असते. या संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदी 62,700 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. कोणत्याही करांशिवाय सोने, चांदी मूळ दर वेगळे असतात. तर उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते.

महाराष्ट्रातील विविध शहरांतील सोने चांदी दर (सर्व दर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार)

मुंबई

22 कॅरेट सोने- 47,150 (प्रती 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोने-49,150 (प्रती 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट सोने- 46,550 (प्रती 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोने- 49,080 (प्रती 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट सोने- 47,150 (प्रती 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोने- 49,150 (प्रती 10 ग्रॅम)

चांदी-627 रुपये (प्रती 10 ग्रॅम)

वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.