Gold-Silver Price Today: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा दर काय?

दरम्यान या सोन्याच्या दरावर जीएसटी, घडणावळ आदी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते.

Jewellery (Photo Credits: Pixabay)

श्रावण महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. आज महाराष्ट्रात श्रावणी पौर्णिमेनिमित्त नारळी पौर्णिमा (Narali Purnima) अर्थात रक्षाबंधन (Rakshabandhan) साजरे केले जात आहे. या सणाच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बाब आहे. आज सोन्याच्या चांदीच्या दरात थोडी घसरण पहायला मिळाली आहे. आज देशात सोन्याचा दर 24 कॅरेट साठी प्रति तोळे 51,640 आहे तर चांदी प्रतिकिलो 58,600 रूपये आहे.

24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं असलं तरीही त्याचा वापर सोन्याच्या दागिन्यांसाठी केला जाऊ शकत नाही. सोन्याचे दागिने 22 कॅरेट, 18 कॅरेट मध्ये बनवले जातात. मुंबई मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळे ₹47,340 आहे. दरम्यान या सोन्याच्या दरावर जीएसटी, घडणावळ आदी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. सोन्याचे सारे दागिने आता हॉलमार्क केलेले असतात. त्यामुळे खरेदीच्या वेळेस ते देखील अवश्यक तपासून पाहा. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?).

नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव नटून थटून समुद्र किनारी पूजा करतात. यामध्येही सोन्याचा नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. तसेच नारळी पौर्णिमेसोबतच आज रक्षाबंधन साजरं होणार असल्याने भावाकडून बहिणीला नाजूकसा सोन्याचा दागिना देखील खरेदी करून गिफ्ट करण्याचा विचार असेल तर सोन्याची किंमत पाहून आज बाहेर पडा आणि त्यानुसार सोन्याच्या दागिने खरेदीचा प्लॅन बनवा. नक्की वाचा: Raksha Bandhan Gifts Under 500: रिमोट कंट्रोलर शटर बटण ते लॅपटॉप स्टँड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 500 रुपयांच्या आतील हटके भेटवस्तूंची यादी, पाहा.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन आता केवळ एका मिस्ड कॉल वरही सोने, चांदी दर सांगते. तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी  8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला  दर उपलब्ध होऊ शकतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif